श्री स्वामी समर्थ काकड आरती SHREE SWAMI SAMARTH
||श्री स्वामी समर्थ||
श्री स्वामी समर्थ महाराज
काकड आरती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती। स्वामी समर्थ तुजप्रती।चरण दावी जगत्पते। स्मरतो तुझी अभिमूर्ती॥धृ॥
भक्तजन येऊनिया दारी उभे स्वामीराया। दारी उभे स्वामीराया।चरण तुझे पहावया। तिष्ठती अती प्रीती॥१॥
भक्तांच्या कैवारी समर्था समर्थ तु निरधारी। समर्था समर्थ तु निरधारी।भेट घेऊन चरणावरी। गातो आम्ही तुझी स्तुती॥२॥
पूर्णब्रम्ह देवाधिदेवा निरंजनी तुझा ठावा। निरंजनी तुझा ठावा।भक्तासाठी देहभाव। तारिसी तु विश्वपती॥३॥
स्वामी तुची कृपाघन ऊठुन देई दर्शन। ऊठुन देई दर्शन।स्वामीदास चरण वंदी। मागतसे भावभक्ती॥४॥

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा